आमच्याबद्दल

पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन 2016 #ट्विटरसंमेलन

येत्या 15 ते 18 जानेवारीला आपण पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन भरवत आहोत, कदाचित हा जगात पहिलाच असा प्रयत्न असावा.तुमच्याकडे ट्विटर खाते असेल तर फाॅलो करा @MarathiWord.

ह्या संमेलनात आपण मराठी ट्विटरकरांस मराठी भाषेत ट्विटरवर लिहण्यास प्रवृत्त करणार आहोत.ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहलं जावं ही या मागे अपेक्षा आहे.ट्विटर संमेलनाचे स्वरूप साधे आणि सुटसुटीत ठेवण्यावर आम्ही भर दिला आहे.

संमेलना दरम्यान आपण #ट्विटरसंमेलन या हॅश टॅगचा वापर करायचा आहे,ज्यामुळे आपल्या ट्विट्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतील.

#ट्विटरसंमेलन मुख्य हॅशटॅग सोबतच आपण आपल्या आवडीनुसार खालील बारा हॅशटॅग वापरू शकता.प्रत्येक हॅशटॅग एका वेगळ्या विषयाला हात घालतो.

#ओळखहॅशटॅग्शी : चला प्रत्येक हॅशटॅग आपण कसा वापरू शकता हे पाहूया:

*  बारा हॅशटॅग मित्र *


1) #माझीकविता :

तुम्ही कविता,चारोळ्या,गाणी,ओव्या,भजन,मराठी गझला लिहता ? मग #माझीकविता वापरून आपण आपल्या कविता हजारो लोकांपर्यंत एका क्षणात पोहचवू शकता.कवितेचे शक्यतो छायाचित्र पाठवावे,वाचण्यास सोपे जाईल(कविता मोठी असेल तर).

2) #माझीकथा :

तुम्ही कथा लिहली आहे ? किंवा लिहू शकता ? तर वापरा #माझीकथा आणि आपल्या कथा आमच्यापर्यंत पोहचवा.आपण खुद्द ट्विटरवर पन्नास ते शंभर ट्विट्स मध्ये कथा लिहू शकता.हा नक्कीच एक वेगळा अनुभव असेल.

3) #माझाब्लाॅग :

तुम्ही ब्लाॅग लिहले आहेत ? किंवा लिहू शकता ? तुमच्या ब्लाॅग बद्दल आम्हाला कळवा #माझाब्लाॅग वापरून.
तुमच्याकडे ब्लाॅग नसेल तर नक्की बनवा.

4) #माझेविचार :

तुमचे मराठी साहित्य आणि भाषेबद्दलचे विचार आपण मुक्तपणे इथे नोंदवू शकता. संमेलनाद्वारे निवडलेल्या विषयांवर आपण आपले मत नोंदवू शकता.

5) #माझीबोलीभाषा

आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्याला अभिमान आहे ? इतरांना तिची महती सांगायला आवडेल ? मग ती कोणतीही असो कोकणी,अहिरणी,
व-हाडी इत्यादी.त्या बोलीभाषेतील गाणी,शब्द,
ओव्या,म्हणी आणि बाकी सगळं आम्हाला सांगु शकता #माझीबोलीभाषा द्वारे.


6) #साहित्यसंमेलन

पिंपरी चिंचवड मध्ये भरणा-या अ.भा साहित्य संमेलनाबद्दलचे विचार आपण #साहित्यसंमेलन टॅग वापरून नोंदवू शकता.

7) #पुस्तकपरिचय :

आपल्याकडे संग्रही असणारे,आपण वाचलेली किंवा वाचणार आहात अशा पुस्तकांची ओळख आपण #पुस्तकपरिचय टॅग वापरून देऊ शकता.
याद्वारे बरीच मराठी पुस्तके पुन्हा चर्चेत येऊ शकतील.

8) #लेखकपरिचय :

आपल्या आवडत्या लेखकाबद्दल आपण #लेखकपरिचय टॅग वापरून त्यांची ग्रंथसंपदा,कार्यकाळ इ.माहिती देऊ शकता.मराठीच्या या थोरांची महती सर्वांना कळणे गरजेचे आहे.

9) #सध्यावाचतोय :

तुम्ही सध्या काय वाचताय ? सांगा आम्हाला #सध्यावाचतोय हा टॅग वापरून. तुम्ही त्या पुस्तकाची समिक्षा इथे ट्विट करू शकता.

10) #सलामपाडगांवकर :

कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना आपण #ट्विटरसंमेलन मध्ये श्रद्धांजली वाहणार आहोत. आपल्या या लाडक्या कवी आजोबाबद्दल आपण आपले विचार मांडू शकता #सलामपाडगांवकर वापरून.

11) #हायटेक_मराठी

मराठी भाषेसाठी निर्माण झालेले अॅप,संकेतस्थळे,तंत्रज्ञानावरची पुस्तके,ब्लाॅग्स इ. बद्दल आपण #हायटेक_मराठी वापरून चर्चा करू शकता.मराठीला तंत्रज्ञानाची भाषा बनवू
पाहणा-या प्रत्येक धडपडीचे आपण कौतुक करूया.

12 ) #मराठी_विश्वकोश_दर्शन

आपण या संमेलनादरम्याण मद्दाम marathivishwakosh.in ला भेट देऊन,
आवडलेल्या नोंदी #मराठी_विश्वकोश_दर्शन टॅग वापरून इतरांना सांगणार आहोत, ज्ञानाचे हे भंडार आपण आता उघडून त्याचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. चला विश्वकोशाचे हे "विश्वरूप" अनुभवूया.

हे #ट्विटरसंमेलन नुसते संमेलन नसून लोकसाहित्याचा उत्सव आहे.

आपण सर्वजण या महायज्ञांस हातभार लावुन जगातील पहिले ट्विटर भाषा संमेलन म्हणजेच "पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन 2016" यशस्वी कराल ही अपेक्षा करतो

आयोजक,
@MarathiWord
ट्विटर मराठी भाषा संमेलन 2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा